गावात युवकांचा 'तो' आयडॉल... पोलिस खात्यातील युवक काल कोरोना पॉझिटिव्ह तर आज निगेटिव्ह...

youth in the police department was positive yesterday and negative today in hatkangle
youth in the police department was positive yesterday and negative today in hatkangle
Updated on

हातकणंगले - पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे गावात अनेकांना त्याचा अभिमान होता. युवकांचा तो आयडॉल ठरला होता. मात्र काल इचलकरंजीच्या यादीमध्ये गावातील त्या पोलिस युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि गावाला धक्का बसला. अनेकांनी व्हाट्स अॅप वर 'लवकर बरा होऊन ये...' असा संदेश दिला. त्यांनीही ही मी लवकरच पुन्हा तुमच्या सेवेत रुजू होईल असा प्रतिसाद दिला. मात्र कालचा पॉझिटिव्ह असलेला हा पोलिस खात्यातील युवक आज मात्र एकाच दिवसात निगेटिव्ह बनला.

प्रशासनाच्या चुकीमुळे रुई ता.हातकणंगले येथील या युवकाचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता. अहवाल प्राप्त होताच ग्रामपंचायतीने तातडीने सर्व परिसर सील केला होता. त्याचबरोबर त्या भागामध्ये औषध फवारणी करण्यात आली होती. गावात यामुळे अनेकांना धक्का बसला होता.गावातील अनेक व्हाट्स अॅप ग्रुप वर तो लवकर बरा होऊन यावा यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आली होती. त्यांनीही ही आपल्या गावकऱ्यांना मी यातून लवकर बरा होऊन येईन आणि पुन्हा तुमच्या सेवेत रुजू होऊ असे भावनिक साद दिली होती.

ते पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही व संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यामुळे गावात धाकधूक वाढली होती. मात्र सकाळी संबंधित प्रशासनाने चुकीमुळे त्याचे अहवाल पॉझिटिव्ह देण्यात आला होता मात्र तो निगेटिव्ह असल्याचा खुलासा केला आणि गावांनी सुस्कारा सोडला. प्रशासनाच्या या गाफीलपणाचा मात्र अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com